डोळ्यात आसवांना ...!!

Started by श्री. प्रकाश साळवी, August 23, 2018, 11:06:04 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले
माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून  गेले
**
आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो
श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले
**
बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला
न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले
**
शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी
चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले
**
आता कुठवर हे सारे साहून जावे कसे !
शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले !
**
अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा
हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबाईल: ९१५८२ ५६०५४