का गेलीस?

Started by sharayu khachane, August 24, 2018, 12:22:44 PM

Previous topic - Next topic

sharayu khachane

का गेलीस?

फुलासारखे तुला जपले होते
मग पाखरा सारखी उडून का गेलीस?
सावली प्रमाणे सोबत होतीस
मग ऊन पडल्यावर निघून का गेलीस?

जीवनाचा आनंद लुटायचा होता
त्या आधी आयुष्य उध्वस्त करून का गेलीस ?
तू शिल्पकार नव्हतीस
मग हृदयावर माझ्या नाव कोरुन का गेलीस ?

माझ्या अंधाराचा तू प्रकाश होतीस
मग मेणबत्ती प्रमाणे वितळून का गेलीस ?
नेहमी साथ मला दिलीस
मग मला एकट सोडून का गेलीस ?

तुला तर दुःखाची चिड होती
मग मला त्यात ढकलून का गेलीस ?
मी दिवा तर तू ज्योत होतीस
मग काजवा बनून विझवून का गेलीस ?

तुला साथ दयायची नव्हती
मग माझ्याशी ओळख करून का घेतलीस ?
तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं
मग प्रेमाची भाषा बोलून का दाखवलीस ?

तुझ्या विरहातून मी सावरलो होता
मग आठवणींना उजाळा देऊन का गेलीस ?
तू मला विसरायचं होत
मग आठवण सोबत घेऊन का गेलीस ?
   सौ.शरयू खाचणे💔