प्रेम प्रवाह

Started by sharayu khachane, August 24, 2018, 02:14:53 PM

Previous topic - Next topic

sharayu khachane

          प्रेम प्रवाह
हृदयातल्या माझ्या कोमल फुला
कळेल का भावनांचा खेळ तुला?

उंच भरारी घ्यायचाय क्षितिजावर
प्रेमपाखरु होऊन बसु फुलाफुलावर

मनातली ही ओढ प्रीतीची
संपवली तू देऊन भेट प्रेमाची

ओसंडून वाहते प्रेम नयनातून
देते प्रमाण प्रेमाचे अश्रूंतून...

क्षणा क्षणाने बनले आयुष्य
कधी ना कळले कुणा भविष्य

विचार पुढचा मी केला नाही
प्रेम प्रवाहात वाहून जा तूही

त्याग नी विश्वासाचे जोडून अश्व
प्रेम रथाने चालवू आपण हे विश्व

सौ.शरयू खाचणे🌹