दुःख लपवून

Started by sharayu khachane, August 24, 2018, 05:28:30 PM

Previous topic - Next topic

sharayu khachane

दुःख लपवून

नभ भरुन आले
अश्रु बनुन वाहले
नको ते मी भोगले
दुःख संपेल का आयुष्यातले

पापण्या भिजून आल्या
रात्री तशाच निजल्या
काही मधल्या दिवसातल्या
आठवणी ताज्या झाल्या

कासावीस जीव माझा
धाव घेत आहे तुझा
घाव अजुनही ताजा
देतो कशाची ही सजा

दुःख लपवून हसायचे आहे
मार्गी जीवन लावायचे आहे
अश्रु डोळ्यात आनंदाचे वाहे
जगाला हे दाखवायचे आहे
     सौ. शरयू खाचणे🌷