जुने क्षण हवे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 25, 2018, 11:05:14 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जुने क्षण हवे*

गळा भेट तुझी माझी ते पुन्हा जगण हवे
मागितले तुला मी ते पुन्हा जुने क्षण हवे

तू असता सुरात
भेट होती वनात
चाचपडत बोलणं
जस घर करत मनात

तू रुसता सखे पुन्हा नव्याने भांडण हवे
मागितले तुला मी ते पुन्हा जुने क्षण हवे

लडिवाळ चाळ्यात
तू रूपवान दिसते
गाली खळी पडते
जेव्हा तू नाजूक हसते

तू पाहता मागे वळून मला दडपण हवे
मागितले तुला मी ते पुन्हा जुने क्षण हवे

तुझ्या नयनांची धार
सार काही सांगून जाते
केसांची एक एक बट
जसे रंग नवे उधळून जाते

मला ही तुझे मन माझ्याकडे तारण हवे
मागितले तुला मी ते पुन्हा जुने क्षण हवे

तुझं निष्ठुर वागण
दुरावा का आणते
जरा विचार करून
तू होकार का सांगते

तुझ्या होकारास नवं नवे कारण हवे
मागितले तुला मी ते पुन्हा जुने क्षण हवे

तुझ्याशी बोलण्याची
गोडी लागली होती
अचानक तुझ्या बदलाने
सल मनात साठली होती

गप्प तुझ्या ओठांचे ते स्पर्श पण हवे
मागितले तुला मी ते पुन्हा जुने क्षण हवे

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर