ह्रुदयावरील जखमांचे , अंत कुठे दिसत नाही .....

Started by dattarajp, August 25, 2018, 11:20:15 PM

Previous topic - Next topic

dattarajp

ह्रुदयावरील जखमांचे ,
अंत कुठे दिसत नाही .....

दगडाचे बनवून शरीर ,
काचेचे ह्रुदय केलास .
सांग देवा ही चूक तू  ,
माणसा सोबत का केलास ?

शरीरा वरील घाव तू , 
हळू हळू भरतोस .
ह्रुदयावर  तू माणसाच्या ,
हळू हळू घाव घालतोस .

शरीरा वरील जखमांचे ,
त्रास फार होत नाही .
ह्रुदयावरील जखमांचे ,
अंत कुठे दिसत नाही .

तुटलेले ते दर्पण मनाचे ,
पुन्हा मी जोडू शकनार नाही .
आता हुभ्या आयुष्यात मी तुझी आठवण,
कधीच काढणार नाही ....

                         पंकज
                 9623567737