तेव्हाच बघ

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 26, 2018, 07:42:21 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तेव्हाच बघ*

तू येशील बघ शेजारी बिलगून बसायला
तेव्हाच बघ लागतील कविता सुचायला

चंद्र तारे लाजतील
ते ही माझे सवे भिजतील
ओल्या मग तुझ्या केसांनी
अंग माझं तू ओल करशील

येऊन मग कर तू सुरुवात रुसायला
तेव्हाच बघ लागतील कविता सुचायला

अंधुक प्रकाशात
सोबत तू देशील
पतंगा परी तू गं
मज जवळी येशील

जेव्हा तू लागशील सुंदर दिसायला
तेव्हाच बघ लागतील कविता सुचायला

नाक मुरडन तुझं
रंग तुझा गोरा पान
दिसतेस तू जणू अप्सरा
जशी सौंदर्याची खाण

पाहून सारं मन लागत बघ फसायला
तेव्हाच बघ लागतील कविता सुचायला

इंद्रधनूच्या रंगा परी
रंग तुला रे सात
चांदण्यांची मैफिलत
जणू तेवणारी वात

जातेस दूर कोण नसतं डोळे पुसायला
तेव्हाच बघ लागतील कविता सुचायला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर