ऋतू

Started by शिवाजी सांगळे, August 28, 2018, 06:19:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ऋतू

हलकेच किनाऱ्या वरून
ऊन पाण्या कडे सरकतं,
शहारतं जरासं पाणी...मग
ऊनही थोडं आक्रसून जातं

स्पर्श जो शितल ऊनकोवळा
जो सकाळी हवासा असतो
होतो मिसळण्याचा सोहळा
संध्येला का दूरावला जातो ?

परस्पर आवेगाची आसक्ती
युगा युगाची तीही ठरलेली...
कित्येकदा घेऊनही कवेत
जाती आपोआपच दूरावली..!

सारे जीवन, हेच का खरे?
सकाळ जन्मोदय म्हणावा!
संपता जीवनऋतू चक्र ते
अत्यंअस्त का न जानावा ?

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९