काल माझा ... !!

Started by श्री. प्रकाश साळवी, August 31, 2018, 04:51:49 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

काल माझा ... !!
----------------------
काल कि हो सत्कार माझा केला त्यांनी
पार्थिवावर माझ्या हार चढविला त्यांनी
**
कोणास शरम नाही हो वाटत नग्नतेची
प्रणय गामिनीचाच सत्कार केला त्यांनी
**
भ्रष्टाचाराचे पीक हो आले भर भरोनी
देवालाही हप्ता भरून दिला त्यांनी
**
तु एकदा सहजच पाहिलेस मागे वळूनी
अर्थाचा अनर्थच कसा पहा केला त्यांनी
**
कोणती श्रध्दा आहे कोणती अंधश्रद्धा
संपवण्या अंधश्रद्धा विडा उचलला त्यांनी
**
लावतो दीप एक त्यांच्या समर्पणाचा
देश रक्षणासाठी कसा देह वेचला त्यांनी
**
कुठे दिसत नाही " ती " भारतीय नारी
संस्कृतीचा बघा बाजार भरविला त्यांनी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४