मैफिलितले गित माझे ... !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, September 05, 2018, 09:12:27 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

मैफिलितले गित माझे ... !!!

मी सुरांना आळविले तु सुरांना घेऊन जा
मैफिलितले गीत माझे तु जरासे ऐकून जा
**
केला ईशारा त्या फुलांनी थोडे लाजून गं
नजरेतले ते बहाणे तु जरा लेऊन जा
**
ये तु अशी चांदणे घेऊन कोजागिरीचे
अन जरासे फेसाळ चांदणे पिऊन जा
**
नजरेतून हे तु काय सांगून गेली सखे
शिशिरातही चिंब अशी तु भिजवून जा
**
ये ये अशी रात्र ही भयाण भासते गं
ओठातिल तुझ्या अमृत ते देऊन जा
**
या सुरांनी आज बेभान केले कसे
शब्द सुरांनी आज तु बरसून जा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४