कानोसा

Started by Dnyaneshwar Musale, September 15, 2018, 10:12:47 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

उंबरा ओलांडला
का
रोज सामोरं जावं लागतं
त्या जीवघेण्या नजरांना,
टर टर करत पेपर फाटावा
तस नजरेनं फाडुन काढतात देहाला,
झालेले तुकडे माझे मलाच मग
गिळावे  लागतात,
नाहीतर तिथे ही कानोसा घेत
येतात डोकावुन पाहायला.

माझ्या वाढत्या वयाला
कुठं चिमटा तर कुठं खेटून,
तु संधी साधुन
हात टोचवत असतो,
माझ्या बाईपणावर
तु तुझा पुरुषार्थ
फक्त गाजवत असतो.

रोजच चालणं हे तर माझ्या साठी
खर जिकरीचंच झालंय,
दारातून दारापर्यंत
त्या साऱ्या नजरांच
माणूसपण जणु विक्रीस गेलेय.

तुझ्या चार चौघातल्या
गप्पा मला आजही चव्हाट्यावरच
आणतात,
पण उंबऱ्याच्या आत पुन्हा
माझ्या
तरुणपनावर तुझ्याच तोंडुन
प्रश्नचिन्ह बनतात.