आसवं

Started by Lalit Patil Sunodekar, September 26, 2018, 10:15:15 PM

Previous topic - Next topic

Lalit Patil Sunodekar

हे माझ्या  मिञा,
काय हे तू केलस,
आज सण आमचा आनंदाचा,
पण डोळ्यात आसवं भरून गेलास,

दुःख आलं म्हणुनी,                                                 गळा झाडाला टांगून गेलास,
अरे  दिवाळी साजरी केली नाहीस,
आम्ही पोळा नसताना केला,
आज सण आमचा आनंदाचा,
पण डोळ्यात आसवं भरून गेलास.....

नको होती आम्हा रंगरंगोटी,
नको होती पुरणपोळी,
एक गुळाचा खळा ही चालला असता,
पैसे नव्हते म्हणुनी ,
तु गळा झाडाला टांगूनी गेलास,
आज सण आमचा आनंदाचा,
पण डोळ्यात आसवं भरून गेलास.......

वेळ होती आम्हा विकण्याची,                                         तु ताईचं  मंगळसूत्र घेऊन गेलास,
अरे इथे माणसांचा व्यापार केला जातो,
तु आमचा नाही करू शकलास,
आमचा त्रास बघावला नाही ,
तु गळा झाडाला टांगूनी गेलास,
आज सण आमचा आनंदाचा,
पण डोळ्यात आसवं भरून गेलास.....

कुणी नाही सोबतीला,
म्हणूनी आयुष्य सोडुनी गेलास,
तुझी आधुनिक टेक्नोलॉजी थकली,
तेव्हा गुडघाभर चिखलात आम्हीच पाय रोवलेत ना?
तुझ्या झाडावरच्या देहाकडे पाहून,
ताईंच काय होणार????
आसवांना सोडून त्यांच्या सोबत  कुणीच नाही राहणार,
सण आमचा आनंदाचा,
पण डोळ्यात आसवं भरून गेलास...