कष्ट मायबापाचं......

Started by Lalit Patil Sunodekar, September 30, 2018, 06:51:22 PM

Previous topic - Next topic

Lalit Patil Sunodekar

लई  फिरलो या देशात,
पिस्ता, बर्गर खाल्ली,
पण तशी चवच मिळाली नाही,
जशी होती माझ्या मायेच्या भाकरीत,

बाप हकले आऊत,
माय पेरते बाजरी,
कष्ट होते त्यात,
तवा भाकर लागतीया गोड...

पोरं शिकावं म्हणून,
गटामधून काढलं पैकं,
पैकं फेडावं म्हणून,
कष्ट केलं रानावनातं......

बाप कापतो ऊस
माय वाहते मोळी,
ऊस कापे चरकणी,
तवा बाप लावतो माती...

रक्त वाहलं मातीत,
तवा शिकलं हे पोरं,
व्यथा मांडता कवितेत,
डोळे आलीयां भरून....

माय बाप होती माझी,
तवा शिकलं हे पोरं,
तवा शिकलं हे पोरं......

(माझ्या आई वडिलांच्या कष्टांना समर्पित)

               -ललित पाटील सुनोदेकर-