अंधारवाटा

Started by Kalarudraksh, October 10, 2018, 05:15:24 PM

Previous topic - Next topic

Kalarudraksh

चा चाचपणीचा

राहता राहिला प्रश्न जगण्याचा
आशेच्या हिंदोळ्यावर रमत फिरण्याचा
बेधुंद असताना धुंद दिसण्याचा
उत्तरोत्तर स्वतःला चिंतेत शोधण्याचा
राहता राहिला प्रश्न जगण्याचा
शून्यात बघून शून्य हरवण्याचा
दुसऱ्याला पाहून स्वतःवर हसण्याचा
त्याच्या दुःखात दुखी होण्याचा
कृत्रिमता पाहून निसर्ग चाचपण्याचा

प्रशांत अशोक कुलथे
८/१०/२०१८