नवरात्री

Started by sneha31, October 10, 2018, 05:18:19 PM

Previous topic - Next topic

sneha31


नवरात्री

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी
रंग निळा घेऊनी आगमन तुझे ग मां शैलपुत्री
सगळ्यांना भरभरून समृद्धी,धन,धान्य तू देते
साळी तुला नेसुनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी
रंग पिवळा घेउनी आगमन तुझे ग मां ब्राम्हचारिणी
सगळ्यांना  यश आणि सुख तू देते
हळदी कुंकू लावूनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी
रंग हिरवा घेऊनी आगमन तुझे ग मां चंद्रघंटा
सगळ्यांना आशीर्वाद देउनी कष्ट निवारण तू करते
हार तुला घालुनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या चवथ्या दिवशी
रंग राखळी घेउनी आगमन तुझे ग मां कुषमंडा
नष्ट करूनी रोगराई स्वस्थ आरोग्य तू देते
बांगड्या तुला भरुनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी
रंग शेंदरी घेऊनी आगमन तुझे ग मां स्कंदमता
सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करून तू देते
गजरा तुला लावूनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी
रंग पांढरा घेऊनी आगमन तुझे ग मां कात्यायनी
कुमारिकेला वर देउनी इच्छा पूर्ण तू करते
ओटी तुझी भरुनी  स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या सातव्या दिवशी
रंग लाल घेऊनी आगमन तुझे ग मां कालरात्री
सगळ्यांच दुःख दूर करून सुख तू देते
पैंजण तुला घालुनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या आठव्या दिवशी
रंग आकाशी घेऊनी आगमन तुझे ग मां महागौरी
सर्व स्त्रियांना सौभाग्य तू देते
नैवैद्य तुला लाऊनी स्वागत तुझे मी करते

नवरात्रीच्या नव्व्या दिवशी
रंग गुलाबी घेऊनी आगमन तुझे ग मां सिध्दात्री
सगळ्यांचे काम पूर्ण करून तू देते
साज तुला घालुनी स्वागत तुझे मी करते.

स्नेहा माटूरकर