भुजंग

Started by शिवाजी सांगळे, October 16, 2018, 08:05:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भुजंग

डिवचू नका तयांना, रमलेल्यां सोहळ्यात
जमले सर्प विषारी, आपल्या कोंडाळ्यात

सोडा आता खुर्च्या, दाबलेल्या पदांच्या
राहू नका रे मग्न, स्वार्थी गोतावळ्यात

वागा सत्य जरासे, भूलथापा कशाला
होऊन जा शहाणे, सत्तेच्या सोवळ्यात

टाक सावध पाऊल, देईल डंख जहरी
ठेवून डूख भुजंग, बसलाय वेटोळ्यात

बेकारच राहतात, शिकली पोरं हल्ली
सडून जाते पदवी, कागदी भेंडोळ्यात

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९