मी माझं गाव पाहिलं

Started by Lalit Patil Sunodekar, October 21, 2018, 01:52:13 PM

Previous topic - Next topic

Lalit Patil Sunodekar

मी माझं गाव पाहिलं,
वास्तवापेक्षा वेगळच दिसलं,
हिरवेगार झाडांऐवजी,
विस्कटलेली बाभळं दिसली.....

हादरा बसला जीवाला,
पाहिलं जेव्हा गोठ्याकडे,
दावांशिवाय दुसरं दिसलंच नाही,
माझ्या गोठ्यामध्ये......

जमिनीवर पडलेल्या भेगा,
माझ्या बापाच्या टाचेवरती दिसल्या,
गाव सोडून चांगलं केलं,
म्हणत अश्रु ढाळत दिसला.......

तरुण ताठी मिञाचा फोटो,
घराच्या भिंतीवरती पाहिला,
बालपणी झोका खेळणार्या पिंपळावरती,
गळा टांगूनी घेतला.......

असा कसा हा दुष्काळ,
माझ्या गावावरती आला,
हिरवीगार शाल ऐवजी,
विस्कटलेली बाभळं घेवून आला....

                        - ललित पाटील सुनोदेकर-