कधी तू ही...

Started by Vasanti, October 25, 2018, 08:29:56 PM

Previous topic - Next topic

Vasanti

*कधी तू ही....*

एकदा तरी माझ्यासारखे, *कधी तू ही जगून बघ*,
दुःखात असतांना ही, *कधी तू ही हसून बघ!*

सोड त्या भविष्याची चिंता इतकी,
जुन्या आठवणीत, *कधी तू ही रमून बघ!*

किती तुझी ही बंधने, किती तुझा तो नकार,
पंख लाउनी मुक्त आकाशात, *कधी तू ही उडून बघ!*

हातात हात तुझा घेऊन, चालेल मी आयुष्यभर,
दोन पावले माझ्या सोबत, *कधी तू ही चालून बघ!*

भेटली तू पुन्हा, या मोहक वळणावर,
गुपित तुझ्या मनातलं, *कधी तू ही सांगून बघ!*

का हा दुरावा इतका, का सारखे दूर जाणे,
बस जरा जवळ, *कधी तू ही संवाद करून बघ!*

वेळ माझा इथेच थांबला तुझ्यासाठी,
मी अजून उभा इथे, *कधी तू ही मागे वळून बघ!*

खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर,
*कधी तू ही माझ्यावर प्रेम करून बघ........*

                        *Vasanti*

मिलिंद कुंभारे


Omkar sawadekar


sangramdada