प्रश्नचिन्ह

Started by मिलिंद कुंभारे, October 26, 2018, 04:39:00 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

प्रश्नचिन्ह

नातं तुझ नी माझं, होतं शब्दांपलीकडलं;
नव्हती कुठली उणीव, अन् राग, लोभ, मत्सर.

मनात माझ्या वसलेलं एक गावं, नदीकाठचं;
अन् तुला आवडायचं शहर ते गजबजलेलं.

तुझं ते सहज शब्दांत व्यक्त होणं;
अन् अव्यक्त सारं, माझं प्रेम वेडं !

मी एक वादळ, तू रिमझिम पाऊस;
होतं तरीही अतूट, नातं तुझं नी माझं !

तू श्वास माझा, अन् विश्वासाचं नाव दूजं !
तू स्वप्न कालचं कि उफाळलेलं ते सत्य वेगळं !

कळेना गावं माझं आज का दंगलीने पेटलं?
नात्यात तुझ्या नी माझ्या हे कसले प्रश्नचिन्ह?

            मिलिंद