वळणावर अखेरच्या.... ( सात)........

Started by Ashok_rokade24, November 12, 2018, 04:25:07 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वळणावर अखेरच्या,
मागे वळून पाहताना,
पूर आसवांचा वाहतो ,
आठवणी आठवतांना,

हासरे नयन तुझे ,
प्रिती नित दाटलेली ,
सुख आयुष्य भराचे ,
स्वप्ने साठवलेली,
नेत्र तुजसवे हासती ,
स्वप्न ऊद्याचे पाहताना ,

पूर आसवांचा वाहतो ,
आठवणी आठवतांना,

लाडीक साद तुझी ,
सुमधूर शब्द तुझे ,
सुकुमार स्पर्श तुझा,
लाजून पहाने तुझे ,
श्वासात सुगंध जाणवे ,
मीठीत तुज घेताना,

पूर आसवांचा वाहतो ,
आठवणी आठवतांना,

यातना माझ्या मनिच्या ,
नयन बरसती तुझे ,
घाव ह्रदयी तुझ्या ,
जखमी हृदय माझे ,
वेदना जानवती पुन्हा,
तुला आठवतांना ,

पूर आसवांचा वाहतो ,
आठवणी आठवतांना,

परी वचनांची माला तुटली ,
नियतीही बदलून गेली,
काळाने घाव घातला,
एकांत माझ्या सोबतीला,
एकांती मन आक्रदंते ,
तुला आठवतांना  ,

पूर आसवांचा वाहतो ,
आठवणी आठवतांना,

                            अशोक मु. रोकडे.
                               मुंबई.