श्रीमंती

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2018, 05:36:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

श्रीमंती

वारसा संतांचा, अभंगाचे मळे
शब्दांमृत फळे, सकल जना !

स्पष्ट होण्या भाव, भाषेचा सहारा
शब्द त्यां फुलोरा, रचनात्मक !

शब्दांतुनी येता, भावनांचा मेळा
श्रोते होती गोळा, सुजाण सारे !

गोडवे आम्हासी, माय मराठीचे
कौतुक शब्दांचे, तिन्ही त्रिकाल !

अर्पुनी शब्दधन, रसिकाचे जाती
लाभली श्रीमंती, कुबेरा पेक्षा !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९