मी आणि बाबा

Started by Supriyapatil121, November 17, 2018, 11:35:04 PM

Previous topic - Next topic

Supriyapatil121

शाळेचा होता माझा जेव्हा पहिलाच दिवस
धरला होता घट्ट मी तुमचा हात
कारण मला जायच नव्हत  शाळेचा आत
मग हळुहळू तुम्हीच लावली शाळेची गोडी

झाला कॉलेज मधून यायला कधी उशीर जरी
परेशान व्हायचे तुम्ही आणि म्हणायचे चिंता वाटते पोरी......
मग आता का नाही वाटत काळजी थोडी ???
मी तर तुमचीच परी....
मग का पाठवता दुसर्यांच्या घरी???

कधी आला ताप जरी...
जागून काढत रात्र सारी
त्या परक्याच्या दारी काय कस होणार
दुखल सुखल कोण माझ बघणार

पण काय करणार मुलगी म्हणे परक्याच धन
जावच लागणार भरून आल जरी माझ मन
माहितेय मला तुम्हालाही होत असेल त्रास
तरीही म्हणे लग्न हा सोहळा असतो खास....

सासरला आपल करणार होऊन माहेरला परकी
बाबा आता मोठी होणार तुमचीही लाडकी

रडता रडताही तुम्ही मला ह्सवल
बाबा आज कळल परक्यालाही आपल करायच का शिकवल.......

........Supriya Patil

Mind_Reader

Very nice. . #HeartTouching
Last line is awsm !! :)