आसवांच्या थेंबात

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 18, 2018, 11:04:22 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आसवांच्या थेंबात*

असाही कधी कधी मी सैरभैर वागतो
अन आसवांच्या थेंबात मग का साठतो

मोकळा मी कधी मोकाट
खेळतो त्या केसांच्या बटांशी
मनमोहिनी तू साजिरी गोजिरी
ओळख करून दे ना ओठांशी

सारे ओळखून असा ही तसा ही सांडतो
अन आसवांच्या थेंबात मग का साठतो

जातेस ना तू कधी कधी
काही क्षण वेचून भेटीचे
श्वास ही थांबतात ना गं
आणतेस अंतर खेचून नभीचे

अंतर ते ही कधी नजर चुकीने गाठतो
अन आसवांच्या थेंबात मग का साठतो

वेळ काढून येत जा तू
हृदयाचे ठोके मोजतांना
काही क्षणांचाच अवधी
कळेल ही मला भेटतांना

वेळ मिळाला नाही तरी रात ती काढतो
अन आसवांच्या थेंबात मग का साठतो

काही दिवसाची प्रीत
जीवाला आधार मागते
कळले कधीच नाही गं
मृत्यू ही ती उधार घेते

प्रीत वेदनेचे उधार मी आज ही फेडतो
अन आसवांच्या थेंबात मग का साठतो

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर