एक दिवस येईलच

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 20, 2018, 11:07:40 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.एक दिवस येईलच*

नाहीतरी कोण असतं आपलं म्हणायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

जायचंच आहे तुला तर
एकदा हळव्या मनाला छळून जा
मरण जवळ येईलच आता
रचलेल सरण ही तू जाळून जा

जळणारच आहे आत्मा ती भरकटायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

मागितलं नव्हतं काहीच तुला
जरासा इरादा होता जपण्याचा
हृदय होते तुझे मंदिर गं
विचार केला होता लपण्याचा

तयार ना झालीस हृदयात मला जपायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

झटकशील हात माझे
खडतर अंधाऱ्या वाटेवर
काजवे ही आले बघ का
जळलेल्या त्या राखेवर

विरान रात काजव्यांची वेळ ना सरायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

राख अशीही झाली होती
न पाहिलेल्या रंगीत स्वप्नांची
रंग ही सारे उधळून गेले
किंमत राहिली फक्त रकमांची

सारं संपून गेलं अर्थ राहिला ना जगायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

सखे असंच असत प्रेम तर
जिव्हाळा तुझा बोचला असता
रक्त रंजित झाली असती धरणी
हृदयी घाव मी तेव्हा सोसला असता

ताकद ना राहिली घाव ते सोसायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर