माझी कविता

Started by surajrathi, November 21, 2018, 05:50:20 PM

Previous topic - Next topic

surajrathi

माझी कविता

तुझ्यावरचे  प्रेम  व्यक्त करण्यासाठी   
माझी कविता मात्र एक निमित्तं असते
तुला मनभरून बघण्याची रोजचीच
डोळ्याची झटपट  असते

हसणं जरी  साधं  तुझं
मला मोहक करून  जात
कवितेच्या वहीत कविता  म्हणून 
तुझेच  चित्र  रंगवत  जातो

माझ्या कवितेचं सुरुवातीचं अक्षर तू
माझ्या कवितेचं शेवटचं अक्षर पण तू
माझ्या कवितेचा पूर्ण सार तू
माझ्या कवितेमधला भाव पण तू

तु सोबत असताना आयुष्य कीती सुंदर वाटत.....
तुझ्या अबोल डोळ्यांमध्ये हरवून जावस वाटत.....
तू जवळ नसलीस कि कविता सुचते
तुझी आठवण आली  कि मनाची  तळमळ सुरु होते