दुष्काळ

Started by Dnyaneshwar Musale, November 26, 2018, 09:31:12 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

पाणी ना पाऊस
आमची  पिकतही  नाही शेती,
समजत नाही साहेब
दुष्काळातही तुमच्याकडेच
उधळलाय  येतात कुठून पोती.

दुष्काळ गरिबी जणुं
पाट्यालाच पुजलय,
तुमच्या आश्वासणाच्या गाजरांनी
माझं रान सार भाजलय.

दिस रात काबाड कष्ट करून
सांच्याला ताटात नसते भाकरी,
काल पेपरात वाचलं होत
संप करून पगार वाढ होते म्हणे
असेल जर सरकारी नोकरी.

गावातली गरिबीची पाय मुळे
खोलवर तशीच रुतलेलीच दिसतात,
तुमच्या भरमसाठ पारदर्शक योजना
फक्त कागदोपत्रीच निजलेल्या असतात.

पिचुन गेलाय आता शेतकरी
पुरा कर्जात,
गरीब गरीबच राहतो
कारण त्याच नाव कधी
येत नाही कर्जमाफीच्या अर्जात.

दुष्काळाच्या नावाखाली
तुमचे होतील ही गावोगावी दौरे,
पुन्हा भाषण बाजी, पुन्हा आश्वासने
माझी गरिबी तशीच
तुम्ही फक्त मतं मागण्यास हावरे.

काहीही झालं तरी
माझं मला पोट काही जड नाही
फक्त एकदा भरून आलं पाहिजे आभाळ,
लाडु पेडा नसला तरी यंदाच्या दिवाळीला
मिरची भाकरी खाऊन आनंदाने निजलं माझं बाळ.

आणि हो
मी ही धीट झालोय
अनं बायकोलाही  शब्द दिलाय,
काळजी नको करू
जरी कितीही आला दुष्काळ
तरी पुसणार नाही  तुझं   
भरल्या कुंकवाच कपाळ.