आळवणी

Started by Dnyaneshwar Musale, November 26, 2018, 09:52:29 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

कोपलास तु
कोरडा राहिला घसा
गुदमरून किती दिस
असा पहाणार तु तहानलेल्या नसा

मालवली पाती
गवताची दिसे आता राख
गरीबाच तुझ्याविना
कसं चालणाररे चाक.

हसु उमटते
कधी अचानक येता
ढग भरुनी
परी दिस जाता चिडीचीप
वाटते केली तुझ्यावर
काय कोणी करणी.

आसाडाव्यात मी तुला
काय दोन चार शिव्या
तु ही जणु रुसलास
देऊन पोकळ नुसत्याच डरकाळ्या.


तुला असेलच काळजी
उशीर फार करु नको
अरे
डोक्यावरच्या भर  उन्हातही
तु येणार याची मलाही आस आहे,
वाट तुझी पाहणाऱ्या सृष्टीचा
तुच रे श्वास आहे.
येणार तु लवकरी
मलाही विश्वास आहे.