प्रपोज

Started by मराठी काव्यपर्ण, November 28, 2018, 11:06:56 AM

Previous topic - Next topic
चंद्र तार्यात तुला
मला तोलता येत नाही
नजरे पुढे असतेस पण
मनातलं बोलता येत नाही
चिटोरीवर लिहावं म्हंटलं
तर शब्दात मांडता येत नाही
एरव्ही मारेन जगाच्या बाता
पण,
आमच्यानं प्रेम व्यक्त होत नाही
एकदा केली हिम्मत विचारायची
मन की बात ओठावर आणायची
पण मला धक्काच बसला
तु तु मैं मैं च्या नादात
तिनेच पहिला प्रपोज टाकला....

कवीःअनिकेत बळवंत मस्के
मो-७२०८६१००२३.