आयुष्याच्या वाटेवर

Started by kavyapremi, December 03, 2018, 07:49:51 AM

Previous topic - Next topic

kavyapremi

आयुष्याच्या वाटेवर सगळंच काही आलबेल नसतं
आणि म्हणून गेलेला तोल सावरायला कोणीतरी साथ हवं असतं
शब्दाने शब्द वाढवून एकमेकाचं कुठं चुकलं हे पाहायचं नसतं
तर शब्दांच्याही पलीकडल्या मायेच्या उबेत विसावायचं असतं
एकानं फटाक्याची दारू झालं तर दुसऱ्यानं वात व्हायचं नसतं
आणि क्षणिक रागापायी संसाराच्या घटाचा स्फ़ोट करायचं नसतं
आपल्या माणसाचं मन ओळखून त्याच्या उणिवांना समजून घ्यायचं असतं
उणिवांनाहि मागे सारून त्या संसाराच्या घटात छानसं रोपटं लावायचं असतं 
ते रोप फोफावायला प्रेमाचं अखंड पाणी घालायचं असतं 
आणि त्या रोपावर फुललेल्या कळीला जीवापेक्षाही जास्त जपायचं असतं
कधी प्रखर उन्हात असताना त्या रोपाला मायेच्या सावलीत सारायचं असतं
पण मंद पावसात मात्र त्याला चिंब न्हाऊ घालायचं असतं
हेवे दावे सोडून माणसातल्या मनाला साद घालायचं असतं
कारण त्या  मनात एक प्रेमाचं अतूट नातं विणलेलं असतं
रागाला त्सुनामीच्या लाटेसारखं उंच जाऊ द्यायचं नसतं
आणि अशी लाट आलीच तर काळजाची होडी करून दोघांनी पार जायचं असतं