जीवनात एक तरी व्यक्ती असं असावं

Started by Swapn_il, December 06, 2018, 11:30:56 PM

Previous topic - Next topic

Swapn_il

जीवनात तुमचा एक तरी व्यक्ती अस असावं ज्याला तुम्ही न काही सांगता सगळं समजावं
जीवनाच्या तुमच्या काही गोष्टीतील गुपित त्याने हळुवार समजावं
तुमच्या मनातल्या भावनांना त्याने पाझर घालावं

जीवनात एक तरी व्यक्ती अस असावं...

जीवनातल्या अवघड वळणावर त्याने सोबत असावं
जीवनाच्या सुखाच्या ठिकाण म्हणून त्यानेच राहावं
तुमच्या चेहऱ्यावर वरच्या हास्याचा कारण तेच ठरावं
तुमच्या प्रेमाचा समुद्र त्याच्यासाठीच राखीव राहावं

जीवनात एक तरी व्यक्ती असं असावं....

प्रेमात सोबत राहण्याच्या अनाभकाच नसावं
दूर असलो तरी त्याला आपलं मन कळावं
प्रभू श्रीरामचंद्र व माता सीता सारख अतूट नातं असावं
नटखट कृष्णा व राधा सारख निख्खळ प्रेम असावं

जीवनात एक तरी व्यक्ती अस असावं...

त्याने थोडस हसावं थोडस रुसावं
थोडस भांडाव थोडंस मनवावं
त्याच्या त्या खोल डोल्यात थोडंस डुबाव
त्याच्या मधुर वाणीत थोडंस रमाव

जीवनात एक तरी व्यक्ती अस असावं...

माझ्या हि नशिबात अस कोण तरी असावं
ज्याच्या हृदयाच्या ठोक्यात मी असावं
माझ्या जीवनात त्याने राहावं
त्याने स्वप्नात मला भेटावं

जीवनात एक तरी व्यक्ती अस असावं....

LoisHunt

या आवृत्त्यांपैकी बर्याच सामग्री मला माहितीची देवाण घेवाण करण्याची परवानगी देतात.