ब्याद

Started by शिवाजी सांगळे, December 08, 2018, 10:21:04 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ब्याद

व्यवस्थाच साली पुरती बाद आहे
फुकटात हवं सारं हा नाद आहे

हवेत कुणास वाद न् भांडणे येथे 
व्यवस्था जातीची खरी ब्याद आहे

निकष लावा कोणतेही आरक्षणास 
न संपणारा आपसात वाद आहे

पताका जरी हातात वेगवेगळ्या
घोषणेत यांचा एकच नाद आहे

पडता पदरी थोडफार जरा काही
एक मुखी म्हणती, याला स्वाद आहे

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९