अंधारातला भास

Started by DK Heart, December 12, 2018, 07:13:26 PM

Previous topic - Next topic

DK Heart

साता समुद्राला विचार तुझ पाणी निळ
का असतं,
जेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलोय
हे जग विरळ का दिसत... 
           
उजेडात दिसतेस,
अंधारात भास होतो,
इतक्यात का सोडून गेलिस,
मी तर तुझा खास  होतो....!

पाण्याचे बिंदू पडताच,
गुलाबाची कळी उमलते,
तशी तुझी नजर माझ्यावर
पडताच,
मन स्वर्ग सुख गाठते...
जीव जळतोय  तुझविण सखी गं,
जगू कस कळत नाही,
मी मरू तर शकत नाही,
तुझ्याशिवाय कोणावर प्रेम करू
शकत नाही....

हातात हात घेतला होता
सोडण्यासाठी नाही,
प्रेम केलयं तुझ्या मनावर
तुझ्या चेहऱ्यावर नाही....!