नकरलेलं प्रेम

Started by Abhishek nikam, December 12, 2018, 10:42:15 PM

Previous topic - Next topic

Abhishek nikam

गुलमोहरा प्रमाणे फुलू पाहनारी आपली मैत्री बहुतेक अनेक जणांना पचली नही
आणि माझ्या भावना तुझ्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत

ग़ैरसमजांमुळे  कमजोर होत  गेली मैत्रिची ही डोर
पण आपन मात्र भांडत राहिलो कोन चूक आणि कोन बरोबर

तुझ्या नजरेत प्रेम फुलू पाहणाऱ्या माझ्या मनाला तू रागाने पाहू लागली
कदाचित त्यामुळेच माझ्या भावना तुझ्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत

नकारात्मक गोष्टीनमुळे तू अजून दूर होत गेली
आणि  मैत्रिची ती डोर कुठेतरी अजून तानत गेली

विसर मला असे बोलून तू माझा तिरस्कार करत राहिली
बहुतेक त्यामुळेच माझ्या भावना तुझ्यापर्यंत कधी पोहोचल्याच नाहीत

माहित नाही काय लिहिले आहे माझ्या नशिबात
पन एक छोटीशि आशा अजूनही आहे माझ्या मनात