अजून काही दिवस

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, December 21, 2018, 11:06:42 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.अजून काही दिवस*

अजून काही दिवस जगावं
अन हे जग खुल्या डोळ्यांनी पहावं
यांतच मनाची चलबिचल व्हायची
तू आलीस अन सारं काही विस्कटून गेलं
जसं रानात पाखरू पाण्यावाचून मेलं

असं जगावं तरी किती दिवस
तुला मिळवण्या फेडले किती नवस
असं वागणं नको होतं तुला
म्हणून सारा काही इथेच घातं झाला
हेच पाहून तो मृत्यू ही जवळ आला

तुझं अस वागणं जरा झोम्बलच मनाला
विस्कटलेला पाचोळा चिटकला तनाला
सरण रचलं हे पाहूंन जगानं
हेच चुकलं सारं काही विचारून जगाला
तू कोण मी कोण विचारू तरी कोणाला

हाच प्रश्न सरण विझवून गेला
दाह देणार तेव्हा पाण्या वाचूनं मेला
तेव्हा तो कलश होता साक्षीला
मेला जो होता तो प्रेमा वाचून गेला
तोच एक खऱ्या प्रेमाचा साक्षीदार झाला

अन तरी काय विचारतो
धडधड नार हृदय तुझंच करतो
इथंच कधी प्रश्नाचं उत्तर मिळत नाही
उरतो तर फक्त स्वप्नांचा संवाद उरतो
शेवटी मग माणसात खोटा देव शोधतो

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).मो.९६३७०४०९००.अहमदनगर