मन हे जाळायचो

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, December 27, 2018, 11:58:36 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.मन हे जाळायचो*

तू असतांनाही असायचो
तू नसतांनाही असायचो
आतल्या आतच मन हे जाळायचो

अवघड होशील म्हणून
सोपी करून पहायचो
तू जवळ होतीस तरी
नकळत लांब रहायचो

बोलायचं म्हणून संपर्क साधायचो
तू असतांनाही असायचो
तू नसतांनाही असायचो
आतल्या आतच मन हे जाळायचो

जवळीक अशी होती
तरी दुःख मनी दाटायचे
सुखाची चाहूल असायची
अन काटे तनी टोचायचे

तन मनानी मी फक्त तुझा व्हायचो
तू असतांनाही असायचो
तू नसतांनाही असायचो
आतल्या आतच मन हे जाळायचो

नयनांची भाषा
चुकून कळायची
अन फुलपाखरे
समोर बागडायची

रंग नवे नवे मग पुन्हा शोधायचो
तू असतांनाही असायचो
तू नसतांनाही असायचो
आतल्या आतच मन हे जाळायचो

तुझ्या माझ्या भेटीची
खरी सूत्रे जुळायची
तुझ्या नाजुक ओठांवर
माझ्या ओठांची नक्षी रूळायची

अंतकरणातून नकळत पुन्हा फसायचो
तू असतांनाही असायचो
तू नसतांनाही असायचो
आतल्या आतच मन हे जाळायचो

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).मो.९६३७०४०९००.अहमदनगर