आगळं पद्य कोडं

Started by mswalimbe, December 30, 2018, 05:16:13 PM

Previous topic - Next topic

mswalimbe

*नेहमीच्या कवितेपेक्षा एक वेगळा प्रयोग केला आहे. बघा वाचून तुम्हासं कसा वाटतो  हा प्रयोग मंडळी*..

सप्तसुरांची सुरावट कानी पडावी
तिचा तो मंजुळ ध्वनी
सप्तरंगी इंद्रधनु जसे नभोमंडलावरी
तसे सारे सुप्त गुणं तिच्या अंगी
अशी ही कोणं
अशी ही *संवादिनी*

हाताची थाप पडावी
लोकसंगिताची चाहूल लागावी
धुन कानी पडावी
अन्  ठेका धरावा पायांनी
अशी ही कोणं
अशी ही *ढोलकी*

तारा खाजवून स्वर निघावेतं
संथ सुरांनी वातावरण बहरावे
त्याने एकट्यानेचं गाण्यासं साथ द्यावे
असा तो कोणं
असा तो *तंबोरा*

तुझ्याचेचं थापेनं होई
एक वेगळ्याचं संगीताचा भासं
तुझ्या चं अंगाखांद्यावर चाले
साऱ्या नाट्यसंगीताचा प्रवासं
असा तू कोणं
असा तू *तबला*

तुझ्या धुनेने होई प्रत्येक
मंगल कार्यक्रमाचा उगमं
तुझे स्वर कानी पडताचं
होई मन आनंदमय
अशी तू कोणं
अशी तू *सनई*

मृणाल वाळिंबे

ता.क. हा नवीन प्रयोग आवडल्यासं *अभिप्राय* कळवा. *तो जास्त मोलाचा*...