वहिवाट

Started by शिवाजी सांगळे, December 31, 2018, 05:33:05 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वहिवाट

वाट्यास आलेला । क्षण रम्य व्हावा ।
जन्म तो सरावा । सेवेसाठी ।।

सामोरी जो येता । क्षण ते मोहाचे ।
भान हो जनाचे । मनी राहो ।।

विसरूनी सेवा । जनहिता वेळी ।
आपुलीच पोळी । भाजू नये ।।

अवलंबू नये । स्वार्थ लोभ नीती ।
विस्कटून नाती । इहलोकी ।।

काळाचीच रीत । व्यवहारी भ्रष्ट ।
अंती करी नष्ट । ध्यानी असो ।।

कोण नित्य येथे । थांबावया आले ।
जाणे ठरलेले । माघारीचे ।।

ऐसी वहिवाट । आहे या युगाची ।
हाक वास्तवाची । ऐक शिवा ।।

© शिवाजी सांगळे 🎭
मो. ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९