मिहि एका मुलीवर जिवापाड प्रेम केलं

Started by Karlevedant7, December 31, 2018, 09:34:22 PM

Previous topic - Next topic

Karlevedant7

माझं पण अर्ध आयुष्य स्वप्न बघण्यातच निघून गेलं
कारण मिहि एका मुलीवर जिवापाड प्रेम केलं.

जन्माला आल्यावर माहित नव्हत कि प्रेम काय असतं
कळत नव्हतं कि ते मनात असतं का रुपात असतं.
माझ्या कपाटाच्या आरश्याने मला याचं उत्तर दिलं
माझं एकटेपणाचं कोडं कसं सहज उलगडलं
मिहि एका मुलिवर जिवापाड प्रेम केलं.

जेव्हा कळलं कि हे प्रेमच आहे तेव्हा वेळ निघून गेलि
तिला कोणीतरी दुसऱ्यानेच पटवून नेलि होति.
प्रेम भंग होऊन वाईट वाटण्यात आयुष्य निघून गेलं
कारण मिहि एका मुलिवर जिवापाड प्रेम केलं.

कळलं नाही का पण पाहताक्षणि तिच्या प्रेमात पडलो,
तिला सांगण्याच्या प्रयत्नात खूप धडपडलो.
तिला मिळवण्याच्या नादात आयुष्य सिंगलच नेलं
कारण मिहि एका मुलीवर जिवापाड प्रेम केलं

वेळ होती दहाविचि काळ होता अभ्यासाचा
मि मोठा ROMEO विचार करत होतो प्रेमाचा!
तिलाच बघत बसायचो तिचाच विचार करायचो,
ऋदयाच्या कॅमेच्यात तिचेच फोटो काढायचो.
फोटो डेव्हलप नाहि झाले पण त्यांना मि सेव केलं
कारण मि हि एका मुलीवर जिवापाड प्रेम केलं.

दहावी झालि distinction मिळवून पासझालो
मात्र प्रेमच्या परिक्षेत अजुनहि फेल राहिलो
तेव्हाही मि सिंगल होतो आताहि मि सिंगल आहे
तिने मात्र तिच्या प्रेमाला चुज केलं
मि हि एका मुलीवर जिवापाड प्रेम केलं.

अता आलि बारावि आयुष्य ठरवणारा हा महत्वाचा
काळ
अजूनही तिचाच विचार करत राहिला हा श्रावणबाळ
परिक्षा आलि होति jee चि निवडायचा होता चार पैकि
एक ओप्शन.
मि मात्र प्रेमाचा पाचवा ओप्शन शोधण्यात वर्ष घालवलं
कारण मिहि एका मुलिवर जिवापाड प्रेम केलं

तिचं ते हसणं मला अजुनहि आठवतं
तिचं जवळ नसणं डोळ्यात पाणी साठवतं
ती बोलायला आल्यावर शब्द नसायचे
तिच्या मुळेच तर मला स्वर्ग दिसायचे.
स्वर्गात नाहि पण तिच्या मुळे आयुष्य वर्गात तरि गेलं
मि हि एका मुलीवर जिवापाड प्रेम केलं.

लोकं म्हणतात प्रेमात पडल्यावर रात्री झोप लागत नाहि,
प्रेमाशिवाय आपल्याला काहिच सुचत नाहि.
पण आई म्हणते आज काल मि जरा जास्तच झोपू
अता आईला कोण सांगणार
तिचं माझ्या स्वप्नात येणे अजूनही नाहि गेलं
कारण मिहि एका मुलिवर जिवापाड प्रेम केलं

प्रेमाचा हा प्रवास असाच चालू राहिलि
पण अजूनही स्वर्ग मि नाहि पाहिला.
एक दिवस ति माझ्या जवळ आणि मला म्हणालि
माझ्याशी मैत्री करशिल का?
माझ्या मैत्रीसाठी प्रेमापुढे हरशिल का?
कोण म्हणतं तिने माझ्यावर प्रेम नहि केलं
तिनेहि माझ्यावर प्रेम केलं फक्तं ते मैत्रितनं व्य्क्तं झालं
मि हि एका मुलिवर..........

                    - वेदांत कार्ले

Theterng2x

हे ज्ञान खूप चांगले आहे. एक दुर्मिळ अनुभव आहे उच्च वर्ग नाही