माणूस

Started by ankurpatil5@, January 05, 2019, 12:03:41 PM

Previous topic - Next topic

ankurpatil5@

अरे माणसा माणसा किती रडशील,
दोन रुपड्यासाठी किती राबशील.
पैसा पैसा करण्यात आयुष्य घालवशील,
आयुष्याच्या वाटेवर एकटा पडशील...

मान, प्रतिष्ठा जपण्यात हरवून जाशील,
स्वतःची ओळख विसरून जाशील.
अहंकार मिरवण्यात आयुष्य घालवशील,
आयुष्याच्या वाटेवर एकटा पडशील...

जाती, धर्माचा डंका किती वाजवशील,
माणुसकीला कधी  जागशील.
स्वतःचा गर्व करण्यात आयुष्य घालवशील,
आयुष्याच्या वाटेवर एकटा पडशील...
आयुष्याच्या वाटेवर एकटा पडशील...

                        - अंकुर प्रशांत पाटील-