तूच माझी माय

Started by TEJU KAMBLE, January 05, 2019, 01:02:34 PM

Previous topic - Next topic

TEJU KAMBLE

तूच माझी माय

देवाला वंदन करताना
तूच दिसतेस समोर
देवा पेक्षा महान
तूच माजी माय

रक्ता मांसाच्या गोळ्याला
नऊ महिने जपले
कडक शिष्तीने
तू आम्हास वाढविले

त्रास होता सारा
सगळे सहन केलेस
चुकीचा मार्ग पासून
तू दूर केलेस
उज्वल आयुष्यासाठी
तू आम्हास घडविले

स्वतः उपाशी राहून
आमचे पोट भरले
करुनी मेहनत सारी
आम्हा प्रेम दिलेस

साऱ्या जगाची आय.....
तूच माझी माय.....तूच माझी माय......


                                         तेजश्री कांबळे