जी होती, ती तर गेली,

Started by haresh1979, January 11, 2019, 11:41:21 AM

Previous topic - Next topic

haresh1979

जी होती, ती तर गेली,
आता कोणास मी पाहू?

ती होती म्हणूनी,
हा श्वास जिवंत होता,
ओल्या केसांतूनी तिच्या,
प्रेम झिरपत होते,
ती होती...

नयनातूनी तिच्या,
घायाळही पक्षी ही होता,
मधूर स्वरांनीही तिच्या,
आसमंत ही दुमदुमत होता,
ती होती...

सिहंकटीच्या चालीने ती चालत होती,
फुल ही सुगंधही सोडत होता,
तिच्या नक्शीदार पेहरापुढे,
इंद्रधनुचे रंग फिके पडे,
ती होती ....
-हरेश ( शेखर ) विजय झरकर
११/०१/२०१९, ११:१० स.