Gambhir Kavita

Started by aarushidate, January 15, 2019, 02:31:25 PM

Previous topic - Next topic

aarushidate

शीर्षक : क्षण - क्षणोक्षणी भेटलेले...

त्या क्षणांना माहीत होते,
सुख दुःखाचे येणे जाणे,
मौन का राहिले मग,
याची शोधते आहे कारणे...

आठवणीत लपले सहज,
मनात सजले नकळत,
क्षणांना सांगते आता,
तुमचे कळू दे मनोगत...

क्षणाक्षणांशी मैत्री ही,
भूत भविष्याची काळजी,
वर्तमानात मात्र हेच क्षण,
बिनधास्तपणे मारतात बाजी...

कसे ही असले तरी, माझे आहेत,
क्षणाक्षणांनी जवळ येतात,
आनंदाचे क्षण देऊन जातात,
माझ्या आयुष्यात रमतात...

ह्याच क्षणांना स्पष्ट सांगते,
तुझे माझे नाते पूर्वजन्मीचे,
जन्म मृत्यूच्या वेढ्यात अडकले तरी
अनमोल हृदयस्थ प्रेमाचे....

-आरुशी दाते
9527740345