Other Poems

Started by aarushidate, January 15, 2019, 02:53:13 PM

Previous topic - Next topic

aarushidate

आज

आठवांच्या जोखडाला बांधलेले,
भाव त्यांचे आजसुद्धा जुंपलेले... ||1||

जन्मताना चेहऱ्यावर उमटलेले,
जीवनाचे सार माथी प्रकटलेले... ||2||

काय बोलू सांग मजला भावलेले,
स्वप्न रेंगाळे मनी जे लोपलेले... ||3||

दर्द कासावीस आता लाभलेले,
दाटला थोडा घसा तर काय झाले... ||4||

भोगतो मी पाप सारे जमवलेले,
दुःख ना वाटे, नशीबच फाटलेले... ||5||

वार होती, रक्त पाहा सांडलेले,
आहुती देती, स्वदेशा जागलेले... ||6||
   
-आरुशी दाते