phunkar

Started by Milind Shantaram More, January 16, 2019, 05:36:10 PM

Previous topic - Next topic

Milind Shantaram More

दिनांक २१.१०.१८

चातका प्रमाणे वाट पाहतो पाहुनी आभाळाकडे |
नाही बरसला घननिळा पाहुनी माझ्याकडे |
आक्रदले मन माझे लागली हुरहुर |
कारे देवा नाही घातली माझ्या वेदनेवर फुंकर ||

वाटे मज तू सर्वांहून सुंदर तूच माझी कामिनी |
इंद्रास ही हेवा वाटे तूच माझी दामिनी |
ध्रुव तारा मज दुरुनी हसे का गेली तू दूर दूर !|
कारे देवा नाही घातली माझ्या वेदनेवर फुंकर ||

मिलिंद मोरे

PREMACHI PAHAT

पहाट तुझ्या आठवणीची बघ सरून गेली |
आस ही तुझी केव्हाच विरुनी गेली |
ओढ तुझ्या मिलनाची होती जरी बाकी |
पण ती तहान मात्र केव्हाच बुजून गेली ||

झाली दुपार आता ज्वानी बहरलेली |
नाजूक ओठांना तुझ्या गुलाबी लाली आली |
स्पर्शात तुझ्या गुंतणे होते जरी बाकी |
पण ती आग मात्र केव्हाच विझून गेली ||

आयुषयची सांज वेळ आता भरून आली |
केला शृंगार तरीही काया थकून गेली |
समजविणे मीच मला होते जरी बाकी |
पण ती तडप मात्र केव्हाच निघून गेली ||

मिलिंद मोरे
२४.१२.१८