तु अन् मी सोबती रहावे...👫

Started by Rohi1327, January 16, 2019, 05:57:20 PM

Previous topic - Next topic

Rohi1327

" का? ग तुझा आभास होतोय,
जवळ असल्या सारखा मला.
अवकाली तो पाऊसही आलाय,
दुर त्या धरणीला भेटायला...!
वाटते बसावे तुझ्या डोक्याजवळ,
अन तुला अंगाई गीत गावे.
मिटलेल्या तुझ्या मंद पापण्या,
अन तु हातात हात घ्यावे.👫
वेळेनेही जरा थांबावे त्यावेळी,
डोळे भरून मी तुला पहावे 👀
मग अशीच ही रात्र सरताना,
असेच आपण आयुष्यभर सोबती रहावे....
       Rohit M. 1327....✍🏻