मनातील निस्वार्थी भावना 😘

Started by Rohi1327, January 16, 2019, 08:32:10 PM

Previous topic - Next topic

Rohi1327

आज ना मनाला माझ्या
खुप काही लिहावसं वाटतय
पण नेमक काय लिहावं
तेच मला उमगत नाही
निसर्गाचे सौंदर्य रेखाटावो की,
करावे वर्णन निस्वार्थी प्रेमाचे.
पण का कुणास ठाऊक
काही काहीच सुचेनासे झालंय
जेव्हा घेतली लिहण्यास हातात कलम
शब्द ही उमटले कागदावर
पण शब्द ही जणू फितूर झालेत
ते फक्त अन् फक्त तुझ्याच साठीचे.
सर्वच म्हणतात जीवनात कोणाला
स्वत: पेक्षा जास्त महत्व देऊ नये
पण आयुष्यात एक दिवस अचानक
जीवनाची सवयच होऊन जात कोणी
मन ही आता गुंतत चाललंय माझ
सर्वांच्या या निस्वार्थी भावनांमध्ये...
नात्यांची खरी किंमत काय असते
हे जीवनात तुझ्या येण्याने समजलीयं
आई-वडीलांच्या प्रेमाला मुकलेला जीव
आज तुझ्या मुळेच मनमुराद हसतोय
बहिणीच्या कुशीत मायेची ऊब भेटली
अन् डोळ्याची पापणी नकळत ओळी झाली
त्या वेड्या ताईने अश्रु ही नाही खाली पडून दिले
मोतीच जणू तलहातावर जपले
सर्वच मिळालयं आता तरी का ? एक
अनामीक भीती मनाला वाटते आहे
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाने तुटणार तर नाही ना
सजवलेली ही माझी स्वप्नांची दुनिया....
          Rohit M. 1327