बाबा तुम्हीच माझे सर्वस्व 👨‍👨‍👧

Started by Rohi1327, January 18, 2019, 09:49:40 PM

Previous topic - Next topic

Rohi1327

बाप म्हणजे काय
बापाची किंमत त्यांना विचारा
ज्याच्यावर लहानपणीच घरची जबाबदारी आली.
एका बापाच्या जाण्याने,
कशी सारी दुनियाच परकी झाली..
मुलांना दिसतो फक्त
निर्दयी अन् कठोर तो ओरडणारा बाप
नाही दिसत लोण्यासारख ह्रदय त्याच
असा असतो निर्मळ मनाचा बाप
आईची गोडवी रोजच गातो
पण त्या बापाच काय ?
ज्याच ह्रदय पोरांसाठी तिळ-तिळ तुटत.
स्वतः खातो खस्ता बाहेर पण
झटत असतो कुटुंबाच्या कल्याणासाठी
घेतो गुंडाळून काट्याचं कुंपण
आणून देतो सारं वैभव पायापाशी.
आईच्या कुशीतील उबदार मायेपुढे
विरून जातो बिचारा बाप
येउद्या कितीही संकटे आयुष्यात
खंबीरपणे उभा असतो तो बाप...
            Rohit M.1327



Rajesh pofare


बाप म्हणजे काय
बापाची किंमत त्यांना विचारा
ज्याच्यावर लहानपणीच घरची जबाबदारी आली.
बापाच्या जाण्याने,
कशी सारी दुनियाच परकी झाली..

मुलांना दिसतो फक्त
ओरडणारा बाप,
नाही दिसत लोण्यासारख ह्रदय त्याच..
पण त्या बापाच काय ?
ज्याच ह्रदय पोरांसाठी तिळ-तिळ तुटत. कुटुंबाच्या कल्याणासाठी!!
आणून देतो सारं वैभव पायापाशी.

येउद्या कितीही संकटे आयुष्यात
खंबीरपणे उभा असतो तो बाप...
          - राजेश पोफारे