*तुला*

Started by कवी-गणेश साळुंखे, January 20, 2019, 11:38:08 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


भूत संशयाचे मनातून तुझ्या
काही केल्या जात नाही
हरलो ग समजावून तुला
तरी तू समजत नाही

           म्हणुनच

किती जरी दिले पुरावे प्रेमाचे
तरी तुला ते पटणार नाही
फेरलेल्या नजरेला तुझ्या सये
आता अश्रु माझे दिसणार नाही

क्षणात तोडलस तू सारं नातं
आता ते काय जुळणार नाही
एक तुझ्यासाठी धडाडणार काळीज माझं
पुन्हा काय धडधडणार नाही

रस्त्यावर कालच्या त्या उभा मी
आता तुला पुन्हा दिसणार नाही
चाललो दूर तुझ्यापासून मी
कि शोधूनही सापडणार नाही

घाव जो लागला उरी माझ्या
त्यास कधी शिवणार नाही
जपून ठेवेल या वेदनेला ह्रदयी
पण कधी दवा करणार नाही.
*कवी - गणेश साळुंखे*
*मो.नं- 8668672192*