अंतरातले दुःख

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 22, 2019, 06:36:26 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.अंतरातले दुःख*

तुझ्यावर केलेले प्रेम वाटते खरी सजा ही
तरी होतं नाही अंतरातले दुःख वजा ही

लावले असते मलम कायमचे जखमेवर
जाहली असती हृदयास किती इजा ही

हल्ली कवितांन भोवताली फिरतेस तू
फिरतांना भेटत नाही मिलनाची मजा ही

मंदिरात होता गजर प्रेमाचा केला मी
उंचावली नाही तुझ्यानावाची ध्वजा ही

लावले होते कलंक जरी या शरीरावर
तरी भेटली नाही तेव्हा मरणाला रजा ही

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर