तुझी साथ ....

Started by Supriyapatil121, January 27, 2019, 12:36:19 AM

Previous topic - Next topic

Supriyapatil121

सोडून माझं घर आले इथे
सार काही नवीन जिथे....

आपल्या दोघांचाच आहे जरी हा खेळ
साधायचा  मला साऱ्यांशी मेळ .....
समजून घे लागला जरी थोडा वेळ ...

तिथे होत जरी सर्व माझं काही ....
इथे मात्र तुझ्याशिवाय काहीच नाही

चुकून कधी झालं जरी वरखाली केव्हा
विश्वास ठेवशील ना माझ्यावर तेव्हा...

सोडून माझं माहेर
तुझ्यासोबत गाठलं मी सासर...

जिथे प्रत्येक वेळी आहे माझी परीक्षा
तू साथ देशील ही एकच अपेक्षा ....
ही एकच  अपेक्षा....







Supriya Patil
Hingoli